ताडकळस (ता. पूर्णा) येथील श्री नृसिंह कनीष्ठ महाविद्यालयात दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिन व एड्स सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री देशपांडे एस. एस. हे होते. तसेच ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथील समुपदेशक आनंद राठोड सर व गाडगीळ डी. के. सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनपर भाषणातून एड्स आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सामाजिक जाणीव आणि गैरसमज दूर करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल महाविद्यालय प्रशासन व सहभागी सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.
