---Advertisement---

नव्या GR नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कस मिळेल?आवश्यक कागदपत्र जाणून घ्या.

On: September 3, 2025 5:27 PM
Follow Us:
---Advertisement---

सरकारने नुकताच जाहीर केलेल्या नवीन GR (शासन निर्णय) नुसार मराठा समाजातील इच्छुकांना कुणबी प्रपत्र (Kunbi Caste Certificate) मिळविण्यासाठी विशिष्ट कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. योग्य कागदपत्रे गोळा करणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नातेवाईकांचा (वडील, चुलते , आत्या , आजोबा , पंजोबा, खापर पंजोबा इ.) कुणबी जातीचा पुरावा सादर करावा.

शाळेच्या नोंदी : रक्ताच्या नातेवाईकचा प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

कोतवाल बूक/ गाव नमुना : स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म-मृत्यू नोंदी कोतवाल बूक किंवा गाव नमुना नं 14 मध्ये असतात.तहसील कार्यालयात अर्ज करून याची नक्कल मिळवता येते.

महसुली कागदपत्रे: वारसा नोंदी (6 ड नोंदी), 7/12 उतारे ,8अ उतारा, फेरफार , खरेदीखत, भाडेपट्टी, क.ड.ई.पत्र,सुड्पत्र,खासरा पत्रक यामध्ये कुणबी असा उल्लेख असावा.

सेवा पुस्तक : नातेवाईक शासकीय व निमशासकीय सेवेत असल्यास , त्याच्या सेवा पुस्तक वरील पहिल्या पानावर कुणबी असा उल्लेख असेल तर कुणबी जातीचा नोंद उतारा म्हणून वापरता येते.

आधीचे प्रमाणपत्र: नातेवाईकाने यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचे कुणबी प्रमाणपत्र व समाज कल्याणचे वैध पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरता येतो.

कागदपत्रे कुठून मिळवावीत?

  • तालुका कार्यालय (Tahsil Office) : ७/१२ उतारे, दफ्तरे
  • शाळा / शिक्षण मंडळ : शाळा सोडल्याचा दाखला
  • जिल्हा अभिलेखागार (District Archives) : जुनी कुणबी नोंदी
  • ग्रामपंचायत / नगरपरिषद : रहिवासी दाखला, जन्ममृत्यू दाखले

महत्वाच्या सुचना

  • सर्व कागदपत्रे जुनी व प्रामाणिक असावीत
  • चुकीची / बनावट कागदपत्रे दिल्यास अर्ज नाकारला जाईल
  • अर्ज करण्यापूर्वी नवीन GR चा अभ्यास करावा
  • अधिकृत माहितीकरिता आपल्या जिल्ह्याच्या तहसील / जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा

👉 टीप: ही माहिती सर्वसामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अधिकृत नियमावली व शासन निर्णय वाचणे अत्यावश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment